सर्वप्रथम आपण जेंव्हा धर्म म्हणतो तेव्हा त्याला तुलनात्मक दृष्टीने त्याच्याकडे पाहून विचार करतो. म्हणजे आपल्याला धर्म हा सुध्दा इतर धर्माच्या तुलनेने ठरवावा लागतो . आता हीच गोष्ट धर्माच्या बाबतीत चुकीची ठरली मग पुढील सर्व काही चुकीचेच ठरणार . मग प्रश्न असा पडतो की धर्म किंवा सनातन विश्वधर्म कुणाला म्हणावे ? याचे उत्तर आहे जो धर्म अशा कालखंडामध्ये अस्तित्वात असेल ज्यावेळेस त्याच्यासमोर इतर धर्म,पंथ किंवा संप्रदाय यांचे काहीच अस्तित्व नव्हते . असा धर्मच विश्वधर्म किंवा सनातन धर्म असला पाहिजे हे सिद्ध होते . आता आपण आजच्या तथाकथित धर्माला ही बाब लागु करून पाहु तर सर्वात अलीकडे आपणास इस्लाम धर्म दिसेल जो ज्यु आणि ख्रिश्चन धर्माच्या तुलनेत वेगळा व्याख्येत जाऊन बसतो. परत आपण ज्यु धर्म पाहु हा धर्म ख्रिश्चन धर्माचे तुलनेत अन्य ठरतो. आता ख्रिश्चन धर्म हा सुरुवातीला अँडम व ईव्ह यांना निर्माण करतो पण येथे तो देव त्यांना का निर्माण करतो ते सांगितले नाही.आणि तो त्यांना एदेनच्या बागेत ठेवतो आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तेथे एक सर्प त्यांना बऱ्यावाईटाचे ज्ञान देणाऱ्या वृक्षाचे फळ खायला सांगतो म्हणजे त्या देवालाही हे माहीत होते की तेथे फसवणूक करणारा सर्प आहे तर मग अशा बागेत त्यांना ठेवतोच कशाला? म्हणजे येथे विश्वनिर्मितीकर्ता सुध्दा अल्पज्ञ ठरतो आहे आणि मग तो आपल्याच निर्मितीवर दुःखी होतो व नष्ट करण्याचा विचार करतो म्हणजे येथे तर देवाच्या ज्ञानाविषयीच अस्पष्टता आहे तर मग धर्म आणि विश्वधर्म याचा विचार कसा ठरवता येईल? आता आपण सनातन आर्य धर्म पाहु येथे वेद आहेत व वेदांना साक्षात करणारे ऋषी आहेत. येथे प्रत्येक सद्गुणी व्यक्ती आर्य आहे व प्रत्येकाचा सत्य वद् धर्म चर अर्थात सत्य बोलणे हाच धर्म आहे ,अहिंसा,अस्तेय ,अपरिग्रह याची शिकवण देणारा आहे. सर्व लोक सुखी असावेत सर्व निरोगी असावेत व दुःख कुणाला ही नसावे अशी प्रार्थना आहे. वसुधैव कुटुम्बकम् हे विश्व एक कुटुंब आहे असे साहचर्य संबंध आहे. धर्म, अर्थ, काम, आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ आहेत. येथे कर्ममार्ग आहे तसाच ज्ञान मार्ग ही आहे पण कसल्याही प्रकारचा अट्टाहास नाही ,मात्र इतर धर्मात केवळ कर्ममार्ग आहे.येथे कोठेही विशेष लोकसमुहच याचा अधिकारी आहे असे म्हंटले नाही. हा धर्म बाकीच्या इतर कोणत्याही धर्माशी तुलना करत नाही तर फक्त प्रत्येक व्यक्तीस सत्याचे समान आचरण करण्यास सांगतो.अर्थात सत्य बोलणे हे वैश्विक तत्व येथे धर्म म्हणून उगम पावले आहे म्हणुनच सर्व मनुष्याचा सनातन विश्वधर्म होण्यास पात्र हाच धर्म असला पाहिजे हे सिद्ध होते. हा कुणाच्याही तुलनेने निर्माण झाला नाही तर जगातील इतर धर्म याच्याच विरोधात्मक तुलनेने निर्मित झालेले आढळून येतात. सत्य हे धर्माचे मुळतत्व आहे जे केवळ असत्याशी तुलना करते आणि असत्य ही मनुष्याची अधोगामी वृत्ती आहे . वेदांचे शब्दप्रमाणांना तो स्वतः च साक्षी आहे ,त्यामुळे सत्याचा साक्षात त्याला सहज आहे.हे आज निर्विवाद सत्य आहे कि सनातन आर्यधर्म हाच सर्व मनुष्यांचा आद्य सनातन धर्म म्हणवून घेण्यास योग्यतेचा आहे.(विनोद मराठे)
No comments:
Post a Comment