Saturday, 28 February 2015

या ब्लॉगचा उद्देश आर्य धर्माची सत्य ऒळख व्हावी या सद्हेतुस्तव

या ब्लॉगचा उद्देश आर्य धर्माची सत्य ऒळख व्हावी या सद्हेतुस्तव झाला आहे .येथे कोणत्याही अन्य धर्माची तत्वमुल्यं अपमानीत करणे हा या ब्लॉगचा हेतू नाही . कोणत्याही विशेष जातीसमुदायाला किंवा धर्माला विरोध करून द्वेष पसरवणे हा संकुचित दृष्टिकोन नाही .तर सर्व धर्माचा समन्वय साधुन परस्पर विद्वेषाची भावना नष्ट करून बंधुत्व वाढीचा प्रयत्न करणे हा आहे. कृण्वंतो विश्वंमार्यम् !!! सर्व प्रथम आपण आर्य या शब्दाची व्याख्या पाहू "आर्य" हा शब्द गुण वाचक आहे . म्हणजे आर्य त्याला म्हणावे जो सत्व,संयम,शांत, अहिंसक आणि ज्ञान हे गुण असणारा  तसेच विवेकी बुद्धी,श्रद्धावान आणि आस्तिक आसणारा तो आर्य समजावा .आता धर्म म्हणजे काय ते पाहू .स्वार्थ -हिंसा -कपट -द्वेष -इ.तामसी वृत्ती तथा चंचलता इ.राजसिक गुणांना परास्त करून सत्वगुण वाढवणारा धर्म आर्यधर्म आहे.