Monday, 28 December 2015

सनातन आर्य धर्म : वर्तमानातच शाश्वत आनंद प्राप्त करणारा धर्म

सनातन आर्य धर्म : वर्तमानातच शाश्वत आनंद प्राप्त करणारा धर्म जगात अनेक धर्म आहेत पण धर्माचे मुलतत्व आनंद वर्तमान काळातच देणारा असा एकमेव धर्म सनातन आर्यधर्मच आहे.मग याचा अर्थ इतर धर्म आनंद देत नाहीत का ? माझ्या मते तात्पुरता आनंद देत असतीलही पण महत्त्वाचे हे आहे कि शाश्वत आनंद वर्तमानातच ते नाही देऊ शकत. वास्तविक तर्कदृष्ट्या पाहिले तर जोपर्यंत मी व माझे शरीरासंबधाने जे सहअस्तित्व आहे आनंद ही त्याला धरुनच असावयास हवा .मला ताप आहे आणि औषधी दुसऱ्या कोणत्याही शरीराला दिली तर काही माझा ताप जाणार नाही तर माझ्या शरीरातच ती औषधी घेण्याने जाणार.तसेच धर्माचेही आहे वर्तमान शरीर आपणास दृश्य आहे आणि जे शरीर आता इथेही सुक्ष्मशरीर ही संकल्पना सुध्दा फक्त आर्य धर्मातच आहे .बाकीच्या धर्मात आता स्थुलशरीर कष्ट पावत असले तरी पुढे हेच मृत झालेले स्थुलशरीर जीवंत केले जाईल याचा कालावधी मनुष्याच्या कालावधीपेक्षा भिन्न आहे ,काहीच सांगता येत नाही की किती काळ ? बस् फक्त मृत पडुन जाण्याशिवाय काही करता येत नाही. आता आर्यधर्मात याच्यापेक्षा एक वेगळी संकल्पना आहे ती म्हणजे या स्थुलशरीरातच सुक्ष्मशरीर आहे तेच स्थुलशरीर मृत झाले कि सुक्ष्मशरीरच आनंद पावते. पण ही गोष्ट थोडी बाजूला ठेऊ यात.ज्याला आपल्या सुक्ष्मशरीराचा साक्षात झाला त्यालाच हा आनंद मिळणार यात काही वाद नाही. पुन्हा आनंद मिळत असला तरी असे सुक्ष्मशरीर आणि त्याच्या अनुभवाचा प्रदेश म्हणजे काही हे स्थुलशरीर नव्हे.वास्तविक विवेकबुध्दीने पाहिले तर सुक्ष्मशरीर ज्यात मनाची तत्व प्रधानता अधिक असते शरीर संपले तरी मन संपत नाही आणि मन संपले तरी शाश्वत आत्मतत्व संपत नाही व आपणाला शरीर व मन या दोघांसहीत वर्तमान काळातच शाश्वत आनंद शोधायचा आहे आणि जगात फक्त सनातन आर्यधर्माशिवाय इतर कोणताच धर्म आपणास अशाप्रकारचा शाश्वत आत्मतत्वाचा आनंद देत नाही . आर्यधर्मातच हा मार्ग आहे यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह । आनन्दं ब्रह्मणो विद्वान् न विभेति कुतश्चनेति। एतं ह वाव न तपति । किमहं साधु ना करवम् किमहं पापमकरवमिति। स य एवं विद्वानेते आत्मानं स्पृणुते उभे ह्येवैष एते आत्मानं स्पृणुते । य एवं वेद। इत्युपनिषत्॥ (तैत्तरीय उपनिषद १२-४-१) त्या (ब्रम्ह) तत्वाला न प्राप्त करताच जिथून वाणी, मनइंंद्रिंयासहित परत माघारी फिरते .त्या ब्रह्माच्या आनन्दाला जाणणारा कशामुळेही भयभीत होत नाही .त्या विद्वानाला मी शुभ कर्म का केले नाही ? मी पाप कर्म का केले? अशाप्रकारची चिन्ता , सन्तप्त करत नाही. (पाप आणि पुण्यालाच तापाचे कारण मानणारा ) जो विद्वान आपल्या आत्म्याला प्रसन्न (आनंदित) ठेवतो त्याला या दोन्ही गोष्टी आत्मस्वरूप दृष्टीस पडतात. जो याप्रकारे अद्वैत आनन्दस्वरूप ब्रह्माला जाणतो अशाप्रकारची ही उपनिषद् (रहस्यविद्या) आहे .(विनोद मराठे)