Sunday, 8 March 2015

॥॥॥॥ आर्यधर्म विचार पध्दती ॥॥॥

 पुष्कळ वेळेला जेव्हा काही गोष्टी सांगतो तेंव्हा त्यापैकी काही सोपपत्तिक म्हणजे rational व काही अनुपपत्तिक म्हणजे irrational असतात. मनाला खरोखर विचारले की जितक्या सोपपत्तिक गोष्टी तितक्या खऱ्या व अनुपपत्तिक तितक्या सर्व खोट्या असे म्हणण्याची तुझी छाती आहे काय? तर ते नाही असेच म्हणेल.कल्पना करा की जेव्हा law मध्ये पुरावे द्यावे लागतात तेव्हा ज्याच्याकडून अधिक पुरावे तो पक्ष बरोबर म्हणतात.पण पुरावेच बरोबर आहेत कशावरून? त्याचप्रमाणे हे पुरावे असे वाटणाऱ्याला भ्रम झाला नसेल कशावरून? अमुक एक मनुष्य दिवसा जेवीत नाही व लठ्ठ दिसतो , ह्यावरुन तो रात्री जेवीत असला पाहिजे असे अनुमान काढले तर काही वातरोगातहि ही स्थिती होत असते म्हणून सोपपत्तिक नेहमी बरोबर असते असे म्हणतां येत नाही. आपल्या मनात काही गोष्टी असतात व त्याच्याशी जुळून एखादी गोष्ट दिसली म्हणजे ती सोपपत्तिक आहे असे आपण म्हणतो.जेव्हा एखाद्या सिध्दांतास आपण उदाहरण मागतो तेंव्हा आपल्याला माहीत असलेल्या गोष्टीचेच आपण सादृश्य मागत असतो. पृथ्वी वाटोळी आहे व ति आपल्या भोवति फिरते असे सांगण्याकरिता आपण एक गोळा घेतो व त्याला सुई टोचुन अशा रितीने फिरते म्हणून सांगतो.पण ह्या पध्दतीत दोष आहे .त्यांने सिध्दांताची बरोबर कल्पना येत नाही. फक्त एका देशाची काय ती कल्पना येते. तेवढ्या दृष्टांतावरुन सिध्दांताचा दुसरा देशहि बरोबर असेल असे सांगण्यास काही एक आधार नाही.तर्काचें हि असेंच आहे. जेव्हा आपण तर्क करतो तेव्हा पदार्थांच्या सर्व बाजू सिद्ध करीत नाही.जसे man is mortal ह्या सिध्दांतात पुष्कळ भाग श्रध्देचाच आहे.man is mortal हे आपण पुर्व अनुभवावरून ठरविले पण पुढे असेंच राहील त्यास काही पुरावा नाही.सारांश आपण अज्ञात अंशावरच पुष्कळ वेळा चालत असतो.आपण उपपत्तिच्या योगाने ठाऊक असलेला एक देशच सांगतो व ते जुळून आले म्हणजे सोपपत्तिक म्हणतो व जे आपल्याला ठाऊक असलेल्याशी जुळत नाही त्यास अनुपपत्तिक म्हणतो.आपणास ज्ञात असें फारच थोडे आहे.तसेच आपणास काल हाहि फार थोडा ज्ञात आहे. तेवढ्यावरुन जेव्हा आपण पर्वताएवढा काल स्थापन करतो तेव्हा धाडस होते.ह्यांतील अज्ञात काल आपल्या संशयांत पडलेला वाटतो परंतू काही गोष्टी अशाआहेत कि त्यापुढे बदलतील.ह्या विषयी संशय घेता येत नाही.कारण आजच मनाला काही गोष्टी बरोबर समजलेल्या असतात व काही अंशमात्र समजतात. अंशमात्रांत पुढचा काळ संशयांत असतो. ह्या अंशवात् पदार्थांचा विचार करावयाच्या दोन पध्दती आहेत. एक स्वकीयांची व दुसरी परकीयांची , परकीयांची पध्दती कार्यापासून कारणाकडे जाण्याची आहे व आपली कारणापासुन कार्याकडे व फिरून पुन्हा कार्यापासून कारणाकडे जाण्याची अशी आहे . कार्य तेवढे बरोबर आहे असं दोघेही मानतात. फरक हाच की कार्यावरून अनुमान करणारे असतात त्यांना कार्याचा साक्षात्कार असतो व कारण अनुमीत असते. दुसऱ्यांना दोन्हीही साक्षात असतात. झाड पाहिले म्हणजे येथे एखादे बीज पडले असावे व त्यापासून हे झाड झाले असावे असे वाटते. त्यात झाडं हे प्रत्यक्ष असून 'बी' अनुमीत आहे. परंतु झाडं लावणाऱ्याला बी व झाडं दोन्ही साक्षात आहेत . चिखल पाहिल्याबरोबर बदली (ढग) आली असावी व पाऊस पडला असावा असे वाटते त्यात चिखल साक्षात असून बदली ही अनुमीत आहे. परंतू ज्याने बदली पाहिली व पुढे चिखल पाहिला त्यास दोन्ही ही साक्षात आहेत. ह्याचा अर्थ असा नाही की ज्याला कारण ठाऊक असते त्याला कार्यही प्रत्यक्ष असते तर जेव्हा कारण माहित असते व पुढे कार्य होते तेंव्हा त्याला कार्य व कारण दोन्ही साक्षात असतात. कार्यावरून कारणाचे अनुमान करणारास फक्त कार्यच साक्षात असते. जे ज्याचे कारण ठरलेले असते त्यापासून पुढे त्याचे कार्य होईलच असा केव्हा केव्हा निश्चय नसतो . परंतू एकदा कार्य झाले म्हणजे ते त्याच कारणापासुन होत असते. बदली (ढग ) आली म्हणून पाणी येईलच असा निश्चय करता येत नाही. परंतु पाऊस आला तर तो बदलीनेच (ढगानेच) येत असतो. सारांश कारणापासुन कार्य होईल ह्याचा संशय असला तरी कार्य झाले तरी तेच कारण आहे असा निश्चय असतो.Scientists कार्यावरून कारणाचा विचार करतात. आपल्याकडेहि नैय्यायिकांची हीच पध्दती आहे. कार्यावरून कारणाचा विचार करणाऱ्याची बुध्दी बालिश असायला पाहिजे.त्यानां कारणमाहित नसते ज्याचें आपल्यालाExplanation देता येत नाही ते जर दुसऱ्याने दिले तर तो बुध्दीमान आहे असें आपण म्हणतो.Explanation म्हणजे समोर असणाऱ्या गोष्टीचीं कार्य कारण श्रृंखला दाखविणे.पुढे आलेले पदार्थ काही explanation देत नसतात तर जेव्हा सामान्य कारण समजते तेव्हाच तेexplanation होते. जेव्हा वैद्य अरुचिचे explanation देतो तेव्हा तो तिचे कारणच सांगत असतो . ह्याप्रमाणे जो जास्त कारणवेत्ता तो अधिक बुध्दीमान व कमी कारणवेत्ता तो कमी बुध्दीमान ठरतो. केवळ कार्यवेत्याला बुध्दीमान म्हणत नाहीत . अलंकार नुसते माहीत असून ते कशाचे आहेत हे माहीत नसले तर तो बुध्दीमान नाही . अरूचि वैद्यास व रोग्यास सारखी माहीत असते ; परंतु रोग्यास तिचे कारण माहित नसते व वैद्यास ते असते म्हणूनच कार्यवेत्याला बुध्दीमान म्हणत नाहीत . आपण जेंव्हा कार्यापासून कारणाचा विचार करतो तेंव्हा त्या विचारात बालिशता असते. अशा रितीने विचार करतांना आपण कार्याचे विभाग करतो किंवा त्यालाanalyse करतो पुस्तकाचा विचार करत असतांना आपण त्याचे बालीश बुध्दी ने तुकडे करतो व अशा रोतीने तुकडे करीत करीत शेवटी एखादा तुकडा मनात ठेवतो, व त्याला परमाणू  असे म्हणतो. हे परमाणू एकत्र जमविले म्हणजे त्यांचे कार्य होते असे आपण म्हणतो ही नैय्यायिक वscientists यांची पध्दती आहे . ह्या पध्दतीने एका गोष्टीचा निकाल लागते नाही . संख्या व जाती ह्याची पदार्थ समजण्यास फार जरूरी आहे . व कार्यावरून ह्या समजत नाहीत. संख्येचा विभाग होत नाही . एका पदार्थांचे तुकडे केले तरी शेवटच्या तुकड्यास आपण एकच म्हणतो . किंवा एका पदार्थातून काही भाग कितीहीदा जरी उणे करीत गेलो तरी उरलेल्या विभागास आपण एकच म्हणतो . आपण पदार्थांचे लहान लहान तुकडे करून अणुत्व जाती परमाणू आहेत असे म्हणतो . जाती ज्ञानाने बरेच काम होते . काष्ठत्व जाती स्थापन केल्यामुळे हे व्यासपीठ लाकडाचे आहे असे आपण म्हणतो . नाहीतर ह्यास लाकडाचे व दुसऱ्यास कशाचे तरी म्हटले असते . हे जातीज्ञान काय आहे? व्यक्तिवरच जाती अवलंबुन आहे असे म्हणता येत नाही. कारण व्यक्ती जातीचे दृश्य(Picture) मनात आणून देत नाही . सादृश्याचे ज्ञान व्यक्तीवरून होत नाही . तर ते आपण मनानेच जुळवून घेतो. सादृश्यावरून जाती ठरवतो ह्यांत चूक होते. आपण व्यक्ती ठरविण्यात विसदृश गुण मनात घेतो व सदृश गुणांकडे दुर्लक्ष करतो आणि जाती ठरविण्यात आपण सदृश गुणांकडे लक्ष देतो व विसदृश गुणाचा परित्याग करतो . ही चूक नैय्यायिक व Scientists ह्या दोघांच्याही लक्षात आली नाही. पुष्कळ जण म्हणतात की जाती व्यक्तीचा अनोन्याश्रय आहे. ह्यांच्या मतेparticular हे general वर व general हेparticular वर अवलंबून आहे. पुस्तकत्व ठाऊक नसले तर पुस्तक म्हणता येणार नाही व पुस्तक माहीत नसले तर पुस्तकत्व समजणार नाही . पण हा अनोन्याश्रय आहे . हा दोष आहे. माझे स्वतःचे असे मत आहे कि, आपण काही गुणांकडे लक्ष देतो व तितकेच गुण ग्रहण करतो आणि त्यास पदार्थ असे म्हणतो .आपण पदार्थ आहे असे म्हणतो तेंव्हा विसदृश गुणांकडे आपण लक्ष देत नसून सदृश गुणांकडेच लक्ष देतो हे असे का होते हे सांगता येत नाही . पण असे होते मात्र खरे . असो, कारण हे काय असते ? जितकी कार्ये उत्पन्न होतात त्या सर्वात कारणाची अनुवृत्ति असली पाहिजे कारण नेहमी जातीला धरून असते ; व्यक्तीला धरून नसते . ते कधीच व्यक्तीला समीप नसते. आपण पेटीतून खांब झाला असे म्हणत नसून लाकडापासुन झाला असे म्हणतो . कार्यालाparticularise करीत असतो . म्हणजे कार्यातील Unity मोडतो. जातीत unity अधिक आहे .आपण जेंव्हा एखाद्या वस्तूचे परमाणू पाहतो तेंव्हा त्या वस्तूची unity मोडतो. अर्थात कार्यावरून कारणाचे अनुमान करण्यात त्या कार्याची unity मोडल्या जाते. आपण जी पदार्थास एकत्व संख्या देतो ती जातीलाच धरून देतो . व्यक्तीला धरून देत नाही . हजार माणसांचे घोळक्यास आपण एक समुदाय म्हणतो . तसेच आपण जेंव्हा एक मनुष्य म्हणतो तेंव्हा परमाणू मिळून झालेल्यासच एक म्हणतो. हे एकत्व जातीसच देतो .जेव्हा पदार्थातून काही व्यक्ति अलग करतो तेंव्हा आपण त्यांना नानात्व देतो. आपण पुस्तकास जेंव्हा नानात्व देतो तेंव्हा त्यातून काही व्यक्तीच काढत असतो. परमाणू मिळून व्यक्ती होते म्हणजे काय होते ? जातीचीच कल्पना जेंव्हा घट्ट होते म्हणजे पुष्कळ स्पेसमध्ये जी जाती ग्रहण करीत होतो ती जेव्हा एकाच थोड्या space मध्ये ग्रहण करतो तेव्हा ती व्यक्ती होते. अर्थात कार्य ही जाती झाली असे म्हणणे भाग पडेल . बरे असे मानले तर कार्यावरून कारणाचे अनुमान होते असे म्हणता येणार नाही. कारण व्यक्तीची कल्पना perception ने होते. अनुमानाने होत नाही . अनेक व्यक्ती मिळून जाति होते. असे माणले तर जिच्याविषयी व्यक्तीची कल्पना केली तशीच दुसरी व्यक्तिहि आहे कि नाही. असेल तर त्यांतील atoms दोन होते कि एक होता. दोन होते व सारखे होते असे मानले तर जाति घेतलीच म्हणजे कार्याचे वेळेला जाती आहे व कारण ही जाती आहे असे म्हणावे. म्हणूनscientists व नैय्यायिक पध्दतीत दोष आहे.आता आपण कारणाची कल्पना जातीवर ठरवू. जाती कारणवादी plato किंवा आपणाकडे सांख्य आहे सांख्यांचें म्हणणे असे आहे कि निरनिराळ्या वस्तुंचे निरनिराळे परमाणू नसून तें एकाच वस्तुंचे विभाग आहेत. ElectronicTheory ह्याच पध्दतीची दिसते.J.J.Thompson म्हणतो जे electrons hydrogen मध्ये आहेत तेच oxygen मध्येही आहेत. त्याने हे आपले म्हणणे अल्फा, बीटा व XRays ने सिद्ध केलेआहे. तो म्हणतो electrons हे विवक्षितdirection मध्ये आले म्हणजे निरनिराळे पदार्थ भासतात. सांख्य ह्यांच्याहि पुढे गेले आहेत.ह्या theory मध्ये एकाच वस्तूच्या परमाणू चे हे जगत् मानले आहे.ह्यांचेelectrons इतके सूक्ष्म आहेत की जर एक atom पृथ्वीएवढा मानला तर त्यामानाने एकelectron चेंडू एवढा होई. ही एक atomic theory आहे. पण हे electrons एकाच वस्तूचे आहेत असे म्हणण्यात त्यांच्यामध्ये जो निरनिराळेपणा होतो तो का होतो ह्याचे उत्तर ह्या theory ने देता येत नाही. निरनिराळे electrons मानले तर त्यामध्ये space असली पाहिजे. ती space काय आहे हे त्या theory ने सांगता येत नाहि. सांख्य म्हणते जाति व space ह्यात फारसा फरक नाही. कारण space ला existence तर आहेच . बरे ती जर व्यक्ति मानली तर ती finite (मर्यादित) आहे असे मानावे लागेल. त्याअर्थी space चा जातीतच अंतर्भाव करणे योग्य आहे.आता matter (पदार्थ) व ही space (पोकळी) ज्याचेपासून प्रतीत होते ती जाती होय, झाले व ह्या जातीलाच सांख्यांनी प्रकृति म्हटले आहे . हे म्हणणे वरील theory पेक्षा बरेच सयुक्तिक आहे .तथापि जातीपासून व्यक्ती कशी होते हें सांख्यांला दाखविता येत नाही . ह्या पध्दतीतहि कार्यावरूनच अनुमान केल्यासारखे दिसते . एक वेदांत पध्दतीच काय ती कारणापासुन बरोबर कार्याकडे येते. वेदांतात सत्व,रज,तम हा भाग सांख्यातूनच घेतला आहे. तथापि त्यात दुसरी एक पध्दती आहे. वेदांताचे मताप्रमाणे एक ब्रम्हच असून ते अज्ञानाने आवृत्त आहे. ब्रम्हावरील जितके अज्ञान नाहीसे होते तितके ब्रह्म स्पष्ट होऊन ते पदार्थरूपाने भासते. कमी अज्ञान निघाले तर तेच ब्रह्म पदार्थ होते व सर्व निघाले तर ब्रह्मरूपाने दिसते. ज्याप्रकारे प्रकाश ज्या ज्या आकाराच्या छिद्रातून काढला त्या त्या आकाराचा होतो. त्याप्रमाणेच पदार्थ दिसते वेळी ब्रह्माचेंहि होतं असते. मन जातीकडे धावते तेव्हा विसदृश गुणांकडे लक्ष देत नाही .त्यामुळे सामान्य चैतन्यावरील अज्ञान दूर होऊन ब्रह्म जातीच्या आकाराने दिसते व व्यक्तिकडे धावते तेव्हा विसदृश गुणांकडे लक्ष देते . त्यामुळे तितकेच अज्ञान दूर होऊन व्यक्ति दिसते . आपण पदार्थाकडे पाहतो तेव्हा आपणास ब्रह्माच्या एक देशाचे ज्ञान होत असून बाकीच्या सर्व देशांचे अज्ञान असते. संसार - ज्ञान हे ब्रह्मज्ञानच होय. कार्यकारणभाव हा पदार्थात नाही. आपण जेव्हा कारण म्हणतो तेंव्हा सारखेपणाकडे लक्ष देतो व विसदृशाकडे दुर्लक्ष करतो व कार्य म्हणतो तेंव्हा विसदृशपणाकडे लक्ष देऊन सारखेपणाकडे दुर्लक्ष करतो.एकंदर कार्यकारणाची ही अशी स्थिती आहे .वस्तुतःकार्य म्हणून काही एक नसुन कारणच आहे व ते अज्ञान होय .ते जितकें दुर केले तितकें ब्रह्म दिसून तें पदार्थाकार भासते. अज्ञान नानाप्रकारचे आहे. सत्व, रज , तम हे त्याचे प्रकार होत. मनाचे ठिकाणी सत्वच फार आहे. कारण ते चैतन्याचे अगदी जवळ आहे. विकार मनात आल्याबरोबरच त्यावरील आवरण लौकर निघते.रज हे सत्वाइतके चैतन्याचे समीप नाही. त्यावरील आवरण निघते पण लौकर निघत नाही. तमांत आवरण फार आहे . त्यात आपण इंद्रियांची मदत घेउन आवरण दूर करीत असतो व नंतर पदार्थ दिसतात . जेव्हा पदार्थ भासतात तेंव्हा त्यात space चे आवरण असते. space म्हणून काही एक नसून जेंव्हा आपण ब्रह्मावरील किंचित आवरण दूर करतो व तितक्यापुरते ब्रह्म पदार्थाकार भासते. तेव्हा त्याहुन बाकीच्या चैतन्यावर आवरणच असते व ते आवरणच म्हणजे space होय. सारांश दुर्लक्ष असलेला चैतन्याचा भागच space होतो. तसेच time म्हणून काही एक नसून जेव्हा बुध्दि एकामागून एक आवरण दूर करते तेंव्हा त्यात जे distance वाटते तीच time होय. एकंदरीत space,time & matter हे अज्ञानाचे कार्य होय. हे meditation ने संपूर्ण दूर होते तेंव्हा  मनुष्य मुक्त होतो.

No comments:

Post a Comment